मी सौ. सुमन वाकळे राहणार कल्याण. ४ - ५ महिन्यांपूर्वी डॉ. अर्चना जनुगड़े यांच्याकड़े औषधोपचारासाठी आले होते. गेल्या ८ - ९ वर्षापासून मी संधिवात रुग्ण आहे. मला खुप त्रास होत होता. ४ - ५ वर्षापासून मी ओर्थोपिडिक ट्रीटमेंट घेत होते. पण माझ्या कंडीशनमधे विशेष सुधारणा नव्हती. माझे सर्व जोइंट्स खूप दुखायचे. ओर्थो ट्रीटमेंटमुळे मला दुखने जरी कमी वाटले तरी माझ्या हाताची बोटे मात्र वाकडी होत चालली होती. दिवसेंदिवस हाडांमधील वक्रता वाढत होती. ओर्थो डॉक्टरांच्या ट्रीटमेंटमुळे माझ्या या अवस्थेत काही सुधारणा होण्याचे चांसेस नव्हते.
एकदा पेपरमध्ये डॉ. अर्चना मॅडमचा लेख वाचला. त्यामध्ये सांधिवातावर मात करू शकतो. अगदी पहिल्यासारखी स्थिती जरी आली नाही तरी हाडांमधील वक्रता कमी होऊन जास्तीत जास्त नार्मल होण्यास मदत होऊ शकते आणि याचा अनुभव मी ४-५ महिन्यांच्या कालावाधीतील ट्रीटमेंटमध्ये घेत आहे. पंचकर्म चिकित्सा म्हणजे संधिवात रुग्णांना एक वरदान आहे. हा माझा अनुभव आहे.
डॉ. अर्चना मॅडमनी ज्या ज्या सुचना केल्या त्यांचे मी तंतोतंत पालन केले व मला बरे वाटायला सुरुवात झाली आहे. मला खात्री आहे माझ्या अवस्थेमध्ये येत्या काही महिन्यातच चांगली सुधारणा होईल. याचे सर्व श्रेय मी डॉ. अर्चना जानुगडे यांना देते.
सौ. सुमन वाकळे
शिवम् कॉलनी, ठाणकर पाडा
कल्याण (प) |